दैनिक पुढारी व अदानी ग्रुपच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन 
सांगली

Sangli News : सुरू झाली बाईक रॅलीची जोरदार तयारी

दैनिक पुढारी व अदानी ग्रुपच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बाईक रॅलीची तारीख जाहीर झाली आणि जिल्हाभरातील महिलांनी या रॅलीत सहभागी व्हायची जोरदार तयारीही सुरू केली. बाईक चालवायला शिकण्यापासून ते आपली बाईक रॅलीसाठी सज्ज करण्यापर्यंतची ही तयारी करताना महिलांमध्ये उत्साह संचारला आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सांगलीत महिलांची भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. ‌‘दै. पुढारी‌’ आणि ‌‘कस्तुरी क्लब‌’ यांच्यावतीने रविवारी (दि. 15 मार्च) सकाळी 7.30 वाजता ही रॅली होणार आहे.

‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्यावतीने महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ‌‘पुढारी भवन‌’पासून रॅलीचा प्रारंभ होणार असून रॅलीत सर्व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कलाकारांना भेटण्याची संधी

या बाईक रॅलीला ‌‘सन मराठी‌’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‌‘इन्स्पेक्टर मंजू‌’मधील वैभव कदम (सत्या), मोनिका राठी (मंजू), सौरभ आहेर (आर्यन) हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कलाकारांना भेटण्याची महिलांना संधी मिळणार आहे.

नारीशक्तीचा नारा बुलंद...

दैनिक ‌‘पुढारी‌’ वृत्तसमूहाच्यावतीने सांगलीसह कोल्हापूर, पुणे, ठाणे येथे महिलांची ही खास सशक्त बाईक रॅली निघणार असून, यामध्ये परंपरा आणि सक्षमतेचा संगम साक्षात अनुभवता येणार आहे. सांगलीतही या रॅलीत शेकडो महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार असून, त्यातून स्त्रीशक्तीचा नारा बुलंद होणार आहे. या जल्लोषी रॅलीचे मुख्य प्रायोजक ‌‘अदानी ग्रुप‌’ असून एंटरटेन्मेंट पार्टनर सन मराठी‌’ हे आहेत. दै. ‌‘पुढारी‌’, ‌‘पुढारी न्यूज‌’, ‌‘आपलं एफएम 91.9‌’ व ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्यावतीने खास गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नववर्षानिमित्त सांगलीतील महिलांसाठी या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

सहभागी प्रत्येक महिलेस हमखास गिफ्ट

रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला खास गिफ्ट कुपन देण्यात येणार आहे. तसेच रॅलीतील उत्कृष्ट सहभागासाठी आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. सहभागी महिलांसाठी चहा आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. सर्व महिलांना ‌‘पुढारी‌’तर्फे मानाचा फे टा बांधण्यात येणार आहे.

उत्साही, जंगी स्वागत...

रविवारी सकाळी साडेसहा वाजता ‌‘पुढारी भवन‌’जवळ लेझीमपथक आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांचे स्वागत होणार आहे. सहभागी महिलांनी साडेसहा ते सात वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. साडेसात वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. अधिक माहिती, संपर्क व नाव नोंदणीसाठी ः 7020767465, 8805007724.

रॅलीचा मार्ग...

सकाळी 7.30 वाजता पुढारी भवन येथून सुरू होणारी ही रॅली राम मंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका, एसटी स्टॅन्ड, झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल, कर्मवीर चौक, विश्रामबाग चौकातून परत पुढारी भवन येथे येणार आहे.

सर्व सहभागी महिलांना चहा, नाश्ता.

उपस्थित प्रत्येक महिलेला हमखास गिफ्ट कुपन.

उपस्थित प्रत्येक महिलेला मानाचा फेटा.

ड्रेस कोड - पारंपरिक वेशभूषा, नऊवारी साडी, सफेद कुर्ता-जीन्स.

रॅलीमध्ये सर्व महिलांना प्रवेश मोफत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT