Praniti Shinde 
सांगली

Praniti Shinde : राजकीय लाभासाठी महिला आरक्षणाची खेळी

खासदार प्रणिती शिंदे यांची टीका : काँग्रेस संघटन सृजन अभियान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : काही राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचा लाभ घेण्यासाठी महिला आरक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये भाजपा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

येथील काँग्रेस भवनामध्ये बुधवारी संघटन सृजन अभियानांतर्गत काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय कॉग्रेसचे निरीक्षक लक्ष्मीकांत राव थोटा, माजी आमदार दीप्ती चौधरी, राजेंद्र शेलार, अजित दरेकर आमदार डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, राजेश नाईक, शैलजा पाटील, जितेश कदम, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महिला आरक्षणाचे धोरण यापूर्वीच काँग्रेस राबवले आहे. आता हे धोरण राजकीय लाभ घेण्यासाठी सुरू आहे. लक्ष्मीकांत राव थोटा म्हणाले, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. तळागाळापर्यंत पक्षाकडून लोकशाही राबवण्यात येते. आता जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी अर्ज करावेत, योग्य कार्यकर्त्यांना यामध्ये संधी मिळेल. आ. विश्वजित कदम म्हणाले, जनता आपल्या सोबत आहे. कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने कामाला लागावे. आगामी काळ हा आपला आहे. तळागाळातील कार्यकर्त्याना बळ देण्याचे काम यापुढे करण्यात येईल. स्वागत विक्रमसिंह सावंत यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सिकंदर जमादार यांनी मानले. यावेळी मालन मोहिते, सुभाष खोत, नंदकुमार शेळके, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT