आरोग्य केंद्रे  
सांगली

कडेगाव ः आरोग्य केंद्रे आजारी

दोन डॉक्टर्ससह 59 कर्मचार्‍यांची कमतरता : आरोग्यसेवा सलाईनवर; प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
रजाअली पिरजादे

कडेगाव : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे रिक्त पदांमुळे सलाईनवर आहेत. आरोग्य केंद्रांत डॉक्टर्ससह 59 कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा देताना काम करीत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण पडत असून रुग्णांचेही हाल होत आहेत. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून ही रिक्त पदे तातडीने भरून घ्यावीत, अशी मागणी आहे.

तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक, वांगी, नेवरी, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे आणि खेराडेवांगी अशी सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर 20 उपकेंद्रे आहेत. या ठिकाणांहून तालुक्याला आरोग्यसेवा पुरवली जाते. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रांत अतिदक्षता विभाग म्हणजे मोठे अपघात किंवा मोठे ऑपरेशनच्या सोयी-सुविधा नसल्याने तसेच कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने रुग्णांना बर्‍याचवेळा उपचारासाठी कराड अथवा विटा, सांगली या ठिकाणी जावे लागते.

हिंगणगाव बुद्रुक आणि मोहित्यांचे वडगाव येथे तर प्रत्येकी एक डॉक्टर कमी असल्याने या केंद्रात रुग्णांच हाल होतात. सध्या तालुक्यातील या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा पुरेसा आहे. तसेच कुत्रे, मांजर, सर्पदंश झाल्यास लस उपलब्ध आहे. यामुळे थोडासा दिलासा आहे. तसेच तालुक्यातील या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचार्‍यांना आणि डॉक्टरना राहण्यासाठी उत्तम क्वार्टर्सची सुविधा असून डॉक्टर्स आणि कर्मचारी या ठिकाणी राहून रुग्णांना सेवा देत आहेत.

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे...

वैद्यकीय अधिकारी : 2, समुदाय आरोग्य अधिकारी : 3, आरोग्य सहाय्यक : 4, आरोग्य सहाय्यिका: 3, आरोग्य सेविका (नियमित) : 10, आरोग्य

सेविका ( कंत्राटी ) : 10, आरोग्य सेवक : 10, लॅब टेक्निशियन: 1, शिपाई : 16

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT