सांगली : विविध पोलिस ठाण्यांकडील जप्त अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. Pudhari File Photo
सांगली

पोलिसांनी 84 लाखांचे अमली पदार्थ जाळून केले नष्ट

17 गुन्ह्यांमध्ये 813 किलो गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर जप्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांकडील पथकांनी वेगवेगळ्या 17 गुन्ह्यांत 813 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. यात गांजा, कोकेन, ब्राऊन शुगरचा समावेश होता. हा साठा जाळून नष्ट करण्यात आला.

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक रासायनिक विश्लेषक समाधान नरवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरभड, सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, हवालदार संकेत मगदूम, सोमनाथ पतंगे उपस्थित होते.

जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज शहर, सांगली ग्रामीण, कुपवाड एमआयडीसी, उमदी, कवठेमहांकाळ, तासगाव, कुरळप व आष्टा या नऊ पोलिस ठाण्यांकडील पथकांनी 17 गुन्ह्यांत 84 लाख रुपये किमतीचा 813.23 किलो गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन जप्त केले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या बैठकीत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीला कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक घुगे यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या 9 पोलिस ठाण्यांकडील 17 गुन्ह्यांत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले. यानंतर पोलिस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक मुंबई, सीआयडी पुणे व केंद्रीय यंत्रणांची परवानगी घेण्यात आली. केंद्रीय अमली पदार्थ गोदामामध्ये जमा केलेला गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर हा मुद्देमाल मिरज एमआयडीसीतील सूर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT