Poultry Farm | पोल्ट्री उद्योगाला मोठा दिलासा! वीज दरात सवलत, तसेच विविध प्रकारचे अनुदानही, मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा!  
सांगली

Poultry Farm | पोल्ट्री उद्योगाला मोठा दिलासा! वीज दरात सवलत, तसेच विविध प्रकारचे अनुदानही, मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा!

‘दैनिक पुढारी’ने फोडली होती पोल्ट्री व्यवसायाच्या समस्यांना वाचा : आमदार सुहास बाबर यांनी केला होता पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

विजय लाळे

विटा : पशुसंवर्धन खात्यालाच आता कृषीचा दर्जा आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आता औद्योगिक दराऐवजी शेतकऱ्यांप्रमाणेच सवलतीच्या कृषी दराने वीज, पोल्ट्री शेड उभारण्या साठी अनुदान, पोल्ट्रीच्या कर्जाच्या व्याजावर अनुदान, कोल्ड स्टोरेज व वाहतूक वाहन खरेदी साठी आर्थिक मदत करणार अशा घोषणांचा पाऊस पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेमध्ये पाडला.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज सोम वारी खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघातील पोल्ट्री आणि कृषी क्षेत्राचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पोल्ट्री क्षेत्राला 'कृषी' दर्जा देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण सवलतींची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकां ना मोठा दिलासा मिळणार आहे.

पोल्ट्री व्यवसायाला 'कृषी' दर्जाचा लाभ

आमदार सुहास बाबर यांनी पोल्ट्री क्षेत्राला 'कृषी' दर्जा देऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची लेखी मागणी केली होती. ही मागणी मान्य करत मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, पशुसंवर्धन खात्याला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आता औद्योगिक दराऐवजी शेतकऱ्यांप्रमाणेच सवलतीच्या कृषी दराने वीज उपलब्ध होणार आहे.

मंत्री पंकजा मुंडे यांच्या पोल्ट्री उद्योगाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा -

*शेड उभारणीसाठी अनुदान: पोल्ट्री शेड उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

*व्याज सवलत:पोल्ट्री उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.

*कोल्ड स्टोरेज व वाहतूक : अंडी व कच्चा माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणी आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या व्हॅन खरेदीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. या सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी व्यावसायिकांनी शासनाचे नियम पाळून रीतसर अर्ज करणे आवश्यक असल्याचे आवाहनही मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आह

कृषी आणि सिंचनासाठी आग्रही मागण्या

आमदार सुहास बाबर यांनी केवळ पोल्ट्रीच नव्हे, तर मतदारसंघातील कृषी व सिंचनाच्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधले. यांत भिवघाट येथे द्राक्ष आणि आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र स्थापन करणे, ठिबक सिंचन योज नेत 'डबल लॅटरल'चा समावेश आणि प्रलंबित अनुदान वाटप करणे, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांचे तब्बल ३९ कोटी ५७ लाख रुपयांचे थकीत अनुदान त्वरित वितरीत करणे, भाऊसाहेब फुंडकर योजनेत द्राक्ष आणि ड्रॅगन फ्रूटचा समावेश करणे, विटा उपजिल्हा रुग्णाल याला त्वरित प्रशासकीय मान्यता देणे, दिघंची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णा लयात श्रेणीवर्धन करणे आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत या मागण्या मांडल्या.

दरम्यान, आमदार सुहास बाबर यांच्या आजच्या या आक्रमक पाठपुराव्या मुळे मतदारसंघातील पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, आता या घोषणांच्या प्रत्यक्ष अंमलबजाव णीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक पुढारीने मांडल्या पोल्ट्री व्यवसायाच्या समस्या

या महिन्याच्या सुरुवातीलाच दैनिक पुढारी मध्ये प्रकाशित झालेल्या विट्याचा पोल्ट्री उद्योग या लेखमालेत राज्यातील पोल्ट्री उद्योगातल्या विविध समस्या चव्हाट्यावर मांडल्या होत्या. त्यावेळी आमदार सुहास बाबर यांनी एकूण ३२ भागांच्या लेखमालिकेमध्ये विस्तृतपणे मांडलेले सगळे प्रश्न आपण अधिवेशनात तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मांडू असा शब्द दिला होता. त्यानुसार आमदार बाबर यांनी हा विषय अधिवेशनात तर मांडलाच परंतु त्यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांची स्वतंत्र भेट घेत लेखी निवेदन ही सादर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT