Gopichand Padalkar  (Pudhari Photo)
सांगली

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट

१४ फेसबुक आयडीधारकांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : भाजपचे जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची वैयक्तिक तसेच सामाजिक बदनामी होईल, अशा स्वरूपाच्या पोस्ट फेसबुकवर प्रसारित केल्याप्रकरणी १४ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत करण चंद्रकांत लवटे (वय २१, रा. पुजारवाडी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, १ जून रोजी सायंकाळी फेसबुकवरील विविध आयडींवरून आमदार पडळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत संबंधितांवर कारवाई केली.

याप्रकरणी किरण हुलवाल, संकेत गावडे, संदीप तुपे, धनाजी यमगर, अनिकेत दिने, विजयाताई मोटे एफसी, संदीपा निगडी, नीलेश पडळकर, सचिन मोटे सुनील धनगर, प्रेरणास्थान सचिन मोटे, हणमंतराव पवार यांच्यासह अन्य फेसबुक आयडीधारकांचा समावेश आहे. यात काही अश्लील नावाने देखील आयडी काढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT