संशयास्पद मृत्यू File Photo
सांगली

Sangli Crime : नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; बाथरूमजवळ आढळला मृतदेह

ईश्वरपूर येथील घटना; पती, सासू-सासऱ्यासह चौघे ताब्यात; डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर जखमा

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील जावडेकर चौक परिसरात राहणाऱ्या जयनाब मुजफर खान (वय २३) या नवविवाहितेचा मृतदेह संशयास्पद रीतीने घरातील बाथरूमजवळ आढळून आला. तिच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. ही घटना शनिवार, दि. ८ रोजी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पती मुजफर, सासरा, सासू व नणंद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयनाब यांचा अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. शनिवारी पती मुजफर हा कामानिमित्त बाहेर गेला होता. सायंकाळी तो घरी परतला असता, जयनाब या बाथरूमजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि नणंद यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT