सांगली

सांगली सिव्हिलमध्ये नवीन सिटीस्कॅन मशिन

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा: कोरोनामुळे आरोग्य सेवेत महत्व सर्वांना समजले आहे. तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी शासकीय रुग्णालयात सव्वा आठ कोटी रुपयांचे सिटी स्कॅन मशिन बसविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा दर्जेदार होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

येथील शिवशक्ती क्रीडांगणाजवळ महानगरपालिका आणि जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टतर्फे उभारण्यात येणार्‍या हॉस्पिटलचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, कोरोना काळात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले आहे. राज्यातील दुसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा मिरजेतील शासकीय रुग्णालयात उभारण्यात आली होती. त्यामुळे निदान करणे सोपे झाले होते.

मिरजेतील महापालिकेच्या रुग्णालयात महिला आणि मुलांसाठी सुसज्ज रुग्णालय होत आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शंभर खाटांचे आणखी रुग्णालय होत आहे. याशिवाय कुपवाड, डिग्रजजवळ रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळ्े गोरगरीब लोकांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

ना. पाटील म्हणाले, महापालिकेच्या जागेत जीवन ज्योत ट्रस्टच्यावतीने उभारण्यात येणार्‍या हॉस्पिटलमध्ये शहरासह जिल्ह्यातील गरजूंना माफक दरात उपचार केले जाणार आहेत. तसेच केवळ कॅन्सरच नव्हे, तर अन्य रोगांवर माफक दरात उपचार केले जाणार
आहेत. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, ट्रस्टचे संस्थापक हरखचंद सावला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वीच उद्घाटनाची भाजपची सवय

कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी भाजपचे आमदार, नगरसेवक यांना देखील आमंत्रीत करण्यात आले होते. परंतु ते सर्वजण अनुपस्थित राहिले. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील नाराजी व्यक्त करीत 'कार्यक्रमापूर्वीच उद्घाटन करण्याची भाजपची ही सवयच आहे' असा टोला त्यांनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT