NEET Exam Pudhari File Photo
सांगली

NEET Exam : वैद्यकीय प्रवेशासाठी आज नीट परीक्षा

ओळखपत्र, फोटो विसरू नका; दीडच्या आत केंद्रावर पोहोचा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा रविवार, दि.3 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत देशभरात होत आहे. सुमारे 22 लाख 79 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात संबंधित यंत्रणांनी तयारी केली आहे.

परीक्षा केंद्रावर पोलिसांबरोबरच सीसीटीव्हीचीही करडी नजर असणार आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी यावर्षी आधारकार्ड आधारित बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. काही कारणास्तव बायोमेट्रिक प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर स्वयंघोषणापत्र घेऊन त्याला परीक्षा केद्रात प्रवेश दिला जाईल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका अशा गोपनीय साहित्याची वाहतूक पोलिस संरक्षणात होणार आहे.

दीडच्या आत केंद्रात...

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात, त्यांनी नीटचा अर्ज करताना सादर केलेले ओळखपत्र, एक पासपोर्ट साईज फोटो, ॲडमिट कार्ड आणि पारदर्शक पाण्याची छोटी बाटली, एवढेच साहित्य घेऊन जाता येणार आहे. दुपारी 1.30 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही. सांगली जिल्ह्यात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, विलिंग्डन कॉलेज, पटवर्धन हायस्कूल सांगली, पुरोहित कन्या प्रशाला सांगली, आर. एन. पाटील गर्ल्स हायस्कूल, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, मिरज महाविद्यालय, मिरज हायस्कूल, वालचंद कॉलेज सांगली आणि शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव येथे परीक्षा केंद्रे आहेत.

टेन्शन वाढवायचा कारभार...

शनिवारी बारावीचा निकाल जाहीर केला आणि लगेच रविवारी नीट परीक्षा, या खेळात शेकडो विद्यार्थी नीट परीक्षेच्या ताण-तणावाखाली आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT