Women Harassment Case Pudhari
सांगली

Dowry harassment case: हुंड्यासाठी नांद्रेतील डॉक्टर विवाहितेचा छळ

हात-पाय मोडून जिवे मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : हॉस्पिटलच्या बांधकामाकरिता काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी डॉक्टर विवाहितेने पगारातील पैसे द्यावेत, ठेव मोडावी आणि माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, म्हणून पतीकडून सतत छळ, तसेच हात-पाय मोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉ. जयश्री सौरभ आळ्ळे (सध्या रा. नांद्रे, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

डॉ. आळ्ळे यांच्या तक्रारीनुसार पती सौरभ युवराज आळ्ळे (रा. शुभ्रा हॉस्पिटल, जनता बँकेसमोर, मेन रोड, अक्कलकोट, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 3 मे 2000 ते 28 मार्च 2025 या कालावधीत पतीने चारित्र्याचा संशय घेऊन छळ केला. माहेरच्या मालमत्तेमधील वाटा नावावर करावा, असे म्हणून पतीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून छळ केला. शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT