सांगली

महापालिकेतील अधिकारी चौकशीच्या ‘रडार’वर!

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : अग्निशमन यंत्रणा बसविल्याचा मोबदला म्हणून सव्वालाख रुपयांची लाच घेणारा महापालिकेचा प्रभारी अग्निशमन अधिकारी विजय पवार प्रकरणात पालिकेतील काही अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चौकशीच्या 'रडार'वर आहेत.

लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी हजर रहावे, यासाठी दोन अधिकारी व दहा कर्मचार्‍यांना नोटीस बजावली होती. यातील काही एक अधिकारी व चार कर्मचारी बदाम चौकातील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांची कसून चौकशी करून जबाब नोंदवून घेण्यात आले.

शुक्रवारीही काही जण चौकशीला हजर राहतील, असे सांगण्यात आले. दरम्यान अटकेत असलेल्या विजय पवार याने चौकशीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्या पोलिस कोठडीची शुक्रवार 30 जून रोजी मुदत संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT