Sleeper Vande Bharat 
सांगली

Sleeper Vande Bharat : मुंबई - बंगळुरू स्लीपर वंदे भारत मिरजमार्गे धावणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

मिरज : गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणारी व प्रतीक्षेत असणारी मुंबई ते बंगळुरू स्लीपर वंदे भारतची प्रतीक्षा अखेर संपली असून लवकरच मुंबई ते बंगळुरू स्लीपर वंदे परत धावणार आहे. ही वंदे भारत मिरजमार्गे सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. बंगळुरू येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल येथे रविवारी त्यांच्या हस्ते बंगळुरू ते मुंबई व्हाया सोलापूर स्लीपर वंदे भारत हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली. याचवेळी मिरजमार्गे देखील लवकरच स्लीपर वंदे भारत धावणार असल्याची त्यांनी घोषणा केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मुंबई ते बंगळुरू स्लीपर वंदे भारत मिरजमार्गे सुरु करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप रेल्वे प्रकोष्ठ प्रदेश संयोजक सुकुमार पाटील व रेल्वे प्रकोष्ठ प्रभारी कैलास वर्मा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वारंवार करत पाठपुरावा करण्यात आला होता.

मुंबई ते बंगळुरू दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्यात आली. परंतु ती सोलापूर मार्गे सोडण्यात आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर सोलापूर मार्गे स्लीपर वंदे भारत सुरू करीत असतानाच मिरज मार्गे देखील स्लीपर वंदे भारत सुरू करत असल्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मुंबई ते बंगळुरू ही मिरज मार्गे धावणारी स्लीपर वंदे भारत प्रत्यक्षात रेल्वे मार्गावर कधी धावणार याची घोषणा मात्र झाली नसली तरी लवकरच स्लीपर वंदे भरत धावणार आहे.

सुपरफास्ट प्रवास

महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या स्लीपर वंदे भारत पश्चिम महाराष्ट्रातून धावणार असल्याने रेल्वेच्या प्रवासी वेळेत बचत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे. तसेच स्लीपर वंदे भारत असल्याने आरामदायी प्रवासाचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT