सांगली

खासदार पाटील, आमदार पडळकर दोन्ही नेते जतच्या धनगर आंदोलकांच्या भेटीस

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षण अंमलबाजवणीसाठी जत तहसील कार्यालयासमोर अशोक गोरड यांचे उपोषण सलग सहाव्या दिवशी सुरू असून खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर हे उपोषणकर्त्याला भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने अशोक गोरड यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. खासदार आमदारांनी आंदोलकांशी औपचारिक भेट घेऊन सोपस्कार पार पाडला पण जिल्हा प्रशासन अथवा पालकमंत्री यांच्याशी संपर्क करून आंदोलन स्थगित करण्यासाठी कोणतीही कृती न करता काळजी घ्या म्हणत आंदोलनस्थळवर भेट देऊन औपचारिकता पार पाडली.

आंदोलक अशोक गोरड यांनी खासदार आमदार यांच्याकडे धनगर आरक्षणाच्या समावेशची गठीत केलेल्या समितीच्या शासन आदेशाची शुध्दीपत्रक काढून धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती करून शासन आदेशाचे शुधिपत्रक जाहीर करण्याचे आवाहन केले.

प्रशासनाने आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.आंदोलक अशोक गोरड यांची प्रकृती खालावत असल्याने आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने धनगर समाज बांधवांच्यामध्ये आंदोलन तीव्र करण्याच्या हालचाली होत आहेत,आंदोलक मरण्याची वाट राज्य सरकार पाहत आहे का असा सवाल समाज बांधवानी केला आहे.

शनिवारी सकाळी आ. गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. सायंकाळी खा. संजय काका पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली. सहाव्या दिवशी अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे ॲड.प्रभाकर जाधव, आणासो ठेंगले, वसंत सलगर, प्रकाश व्हनमाने ,विक्रम ढोणे,वसंत सलगर,मधुकर नरले,सतीश कांबळे, काराजनगीच्या सरपंच संगीता लेंगरे आदींनी पाठिंबा दिला.

प्रांताधिकारी फिरकले नाहीत

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अशोक गोरड यांचे आमरण उपोषण ,आंदोलन गेल्या सहा दिवसापासून सुरू आहे.आंदोलनस्थळाजवळून प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे तहसिल कार्यालयात आंदोलनाकडे बघत गेले पण आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी भेटण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. यामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता झाली आहे.

SCROLL FOR NEXT