Sangli News: नवजात अर्भक टाकून मातेचे पलायन File Photo
सांगली

Sangli News: नवजात अर्भक टाकून मातेचे पलायन

‌‘सिव्हिल‌’मधील घटना : तीन महिन्यांनी घटनेची नोंद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका मातेने आपल्या आठ दिवसांच्या बाळाला तेथेच टाकून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा नाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित माता जनाबाई सोमनाथ लमाणी (वय 25, रा. हदरगट्टी, ता. लक्ष्मेश्वर, जि. गदग, कर्नाटक) हिच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित जनाबाई लमाणी ही नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिथे तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, बाळ अवघ्या आठ दिवसांचे असताना, 3 डिसेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जनाबाई बाळाला रुग्णालयातच टाकून कोणालाही काहीही न सांगता पसार झाली. बाळाला सोडून माता पळाल्याचा प्रकार लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने अधिष्ठाता यांना या घटनेची माहिती दिली.

अधिष्ठातांच्या लेखी परवानगीनंतर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा नाडे यांनी 6 मार्चरोजी सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. या तक्रारीनुसार, संबंधित महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT