शिराळा शहर : शिराळकरांची अस्मिता असणार्या जगप्रसिद्ध नागपंचमीला 2001 पूर्वीचे गतवैभव मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असून त्यास नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, संपतराव देशमुख, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक, जयसिंगराव शिंदे, सम्राट शिंदे, माजी नगरसेवक केदार नलवडे, अनिता धस, विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देशमुख म्हणाले, पर्यटनाचे वैभव ठरणार्या शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे भव्य दिव्य स्वरूपात उभारण्यात येणार्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपण प्रयत्नशील असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, आगामी निवडणुकीत युती करायची की स्वबळावर लढायचं हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे. मात्र आपण निर्णय काहीही झाला तरी तयारीत राहायचं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी गाफील राहू नये. भाजप बोलत नाही तर करून दाखवते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करून मला मोठी संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. सत्यजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार संभाजी नलवडे यांनी मानले. यावेळी जयराज पाटील, अशोक पाटील, अनिल देशमुख, आनंदराव पाटील, कुलदीप निकम, बाजीराव शेडगे, सर्जेराव पाटील, वैभवी कुलकर्णी, रूपाली भोसले, अनिता माने, सुदाम पाटील, तानाजी कुंभार, भीमराव पाटील, वीरेंद्र पाटील, धनाजी नरुटे उपस्थित होते.