प्रकाश शिक्षण मंडळात आ. जयंत पाटील यांचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. Pudhari Photo
सांगली

आ. जयंत पाटील यांचा इस्लामपुरात निषेध

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

राजकीय द्वेष मनात ठेवून आ. जयंत पाटील यांनी कोरोना काळात सत्तेचा वापर करत प्रकाश हॉस्पिटल व शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी, कर्मचार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास लावले. या गोष्टीचा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शुक्रवारी भांडाफोड केला. या घटनेचा निषेध म्हणून प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आ. जयंत पाटील यांचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.

प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. विजय पाटील, डॉ. रोहिणी करंबेळकर, डॉ. शिवानंद दोडामनी, एल. आर. पी. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू पाटील उपस्थित होते. अभिजित पाटील म्हणाले, कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला होता, तो फक्त आम्हाला नाही तर आमच्या कुटुंबांना झाला होता. अशी वृत्ती असणारी माणसे राजकारणातून खड्यासारखी बाजूला काढण्याची गरज आहे. या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT