Idris Nayakwadi 
सांगली

Idris Nayakwadi : आमदार इद्रिस नायकवडी यांना जीवे मारण्याची धमकी

मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांना अज्ञाताने पत्र पाठवून थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू’, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार नायकवडी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असताना, आमदार इद्रिस नायकवडी यांनी याविरोधात भूमिका घेतली होती. गेल्याच महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अधिकृत पत्र लिहून या महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे नमूद करत, येणाऱ्या राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता असल्याने पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी पत्रात केली होती.

या राजकीय भूमिकेनंतर आमदार नायकवडी यांना अशा प्रकारे धमकीचे पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT