मिरज : मालगाव रस्ता येथील इंदिरा नगर, म्हाडा कॉलनी या परिसरात तांत्रिक कामामुळे मंगळवार दि. 24 मार्च आणि बुधवार दि. 25 मार्च 2026 रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या मिरज पाणी पुरवठा विभागांतर्गत मालगाव रस्ता येथील इंदिरानगर, म्हाडा कॉलनीजवळील पाण्याच्या टाकीला स्लॅबमध्ये किरकोळ गळती लागली आहे. ही गळती थांबवण्यासाठी तातडीचे दुरुस्ती काम आणि पाणी टाकी स्वच्छतेचे काम प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले आहे. सोमवार दि. 23 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल. त्यानंतर दुपारपासून प्रत्यक्ष दुरुस्ती व स्वच्छतेचे काम सुरू होईल. त्यामुळे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल.