Miraj Crime Pudhari
सांगली

Miraj Crime: मिरजेत सौरभ पोतदार टोळीची पोलिसांकडून चोप

अल्पवयीन ताब्यात : चौघांना अटक; चार कोयते जप्त; टोळीला परिसरात फिरविले

पुढारी वृत्तसेवा

मिरज : दहशत माजवित लुटमार करणाऱ्या सराईत गुंड सौरभ पोतदार टोळीचे मिरज शहर पोलिसांनी चांगलेच कंबरडे मोडले. लुटमार केलेल्या ठिकाणी टोळीला परिसरात फिरविले. त्यानंतर त्यांची दहशत मोडित काढण्यासाठी भर चौकात बेदम चोप देण्यात आला. त्यांच्याकडून चार कोयते जप्त करण्यात आले आहेत.

या टोळीचा म्होरक्या सौरभ पोतदार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्याराचा धाकाने लुटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सौरभ पोतदार याने गुरुवारी रात्री 10 वाजता ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि एक अल्पवयीन गुन्हेगारासह छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रदर्स अड्डा येथे लूटमार केली होती. कॅफे चालकाला कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याच्या कॅफेवर दगडफेक करून तोडफोडही केली होती. याप्रकरणी टोळी प्रमुखासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार कोयते आणि दुचाकी असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सौरभ पोतदार याची शहरात दहशत निर्माण झाली होती. त्याने कोयत्याच्या धाकाने अनेकांना धमकावले होते. त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्याने लूटमार केलेल्या कॅफेजवळून त्याला फिरवले. टोळीतील तिघांनाही बेदम चोप दिला. यावेळी मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक संजय चव्हाण, हवालदार अमोल आवळे, दीपक परीट, राजेश गवळी, नितीन मोरे, झाकीर काझी, श्रीकांत केंगार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT