baby death 
सांगली

Newborn Baby Death : अर्भक मृत्यूप्रकरणी मातेला अटक

स्वत:च केला गर्भपात; रुग्णालयात दाखल, अर्भकाचे नमुने घेतले

पुढारी वृत्तसेवा

मिरज : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज प्रसूतिगृहातील महिला शौचालयात मृतावस्थेत सापडलेल्या अर्भकाच्या मातेला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. माधुरी परशुराम कांबळे (वय 30, रा. म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, मिरज) असे तिचे नाव आहे. तिला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, माधुरी कांबळे ही मिरजेतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करते. सोमवार, दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता ती मिरजेतील महापालिकेच्या प्रसूतिगृहात आली. तिने आपल्याला रक्तस्राव होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी डॉक्टरांनी तिच्याकडे ‌‘किती महिन्यांचा गर्भ आहे?‌’ अशी विचारणा केली; परंतु तिने डॉक्टरांची दिशाभूल करीत दोन महिन्यांचा गर्भ असल्याचे सांगितले.

यावर दोन महिन्यांचा गर्भ असताना रक्तस्राव होत असल्यास महापालिकेच्या प्रसूतिगृहात उपचार शक्य नसल्याचे सांगून, तिला मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी माधुरी कांबळे हिने तेथील कर्मचाऱ्यांकडून महिला शौचालय वापरण्याची परवानगी घेतली व ती शौचालयात गेली. तेथे स्वत:च गर्भपात करवून नवजात अर्भक शौचालयातच टाकून ती पुन्हा रुग्णालयात आली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ‌‘मिरज शासकीय रुग्णालयात जाते‌’, असे सांगून ती घरी निघून गेली.

निर्दयी मातेचा यापूर्वीही दोनवेळा गर्भपात

माधुरी कांबळे हिला दोन मुली आहेत. तिचा पती कामानिमित्त कर्नाटकात राहण्यास आहे. ती इंदिरानगर येथे आईजवळ वास्तव्यास असून रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करून उदरनिर्वाह चालविते. तिने यापूर्वीही दोनवेळा स्वत:चा गर्भपात केला आहे. हा तिसरा गर्भपात असल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT