मिरज : मिरज-मालगाव रस्त्यावर मोटारीला भरधाव वेगाने धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंजुनाथ तिप्पण्णा कुसनगौड (वय १६, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील तिप्पण्णा हलाप्पा कुसनगौड (वय ४१) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मृत मंजुनाथ कुसनगौड याचे वय पूर्ण नसतानादेखील वडील तिप्पण्णा कुसनगौड याने त्याला दुचाकी चालवण्यास दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.