मिरज : लग्न करण्याच्या उद्देशाने मिरजेतील शास्त्री चौक येथून मुलीचे अपहरण करण्यात आले. यावेळी विरोध करणार्या तिच्या आईच्या तोंडावर स्प्रे मारून दोघा संशयितांनी मुलीला पळविले. याप्रकरणी मुलीच्या आईने फरहान जमीर शेख (रा. मांजरी, पुणे) आणि त्याचा मित्र अशा दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी, मुलीची आई व त्यांची मुलगी या दोघी दि. 30 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या पाळतीवर असणार्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर दोघा संशयितांनी त्यांना गाठले. दोघांनी मुलीला पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीच्या आईने विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या यांच्या तोंडावर स्प्रे मारून दोघांनी मुलीला लग्नाच्या उद्देशाने पळवून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याच माहिती अधिकार्यांनी दिली.