Miraj Accident 
सांगली

Miraj Accident : बेधुंद कारचालकाचा थरार!

मिरजेतील गुरुवार पेठेत चार ते पाच दुचाकींना उडवले

पुढारी वृत्तसेवा

मिरज : शहरातील गजबजलेल्या गुरुवार पेठ परिसरात शनिवारी रात्री एका बेधुंद कारचालकाने धुमाकूळ घालत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. दुचाकींच्या आसपास नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि जीवितहानी झाली नाही.

गुरुवार पेठ हा परिसर वर्दळीचा असून येथे रात्रीच्या वेळीही नागरिकांची आणि वाहनांची ये-जा सुरू असते. शनिवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिक जमा होण्यापूर्वीच कारचालकाने न थांबता वाहनासह तेथून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT