Crime News Pudhari Photo
सांगली

Miraj Crime : ऊसतोड मजूर न पुरवता 35 लाखांची फसवणूक

ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरज : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने वाहतूकदाराची तब्बल 35 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल मारुती टाकळे (वय 41, रा. जैनबस्तीजवळ, म्हैसाळ, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. टाकळे हे कारखान्यास ट्रॅक्टरद्वारे ऊस पुरवठा करणारे वाहतूकदार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद शांताराम भिल, जोतिराम गोपीचंद भिल, मोतिलाल गोपीचंद भिल व वसंत राजघर भिल (सर्व रा. टिखी, ता. जि. धुळे) हे ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम आहेत. आरोपींनी फिर्यादींना ट्रॅक्टरसाठी ऊसतोड मजूर आणून देतो असे सांगून वेळोवेळी मोठी रक्कम घेतली. दि. 20 फेब्रुवारी 2025 पासून आजअखेर आरोपी क्रमांक 1 याने 7 लाख 41 हजार 300 रुपये, आरोपी क्रमांक 2 याने 7 लाख 67 हजार रुपये, आरोपी क्रमांक 3 याने 6 लाख 51 हजार 700 रुपये, तर आरोपी क्रमांक 4 याने 13 लाख 67 हजार रुपये असे एकूण 35 लाख 27 हजार रुपये घेतले.

मात्र ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध करून न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT