Miraj Crime News | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ File Photo
सांगली

Miraj Crime News | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

पती, सासू, सासरा, दीर, नणंदांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मिरज : माहेरहून दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसह, मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेने पती, सासू, सासरा, दीर, आणि चार नणंदा यांच्याविरोधात मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आठजणांवर गुन्हा दाखल आहे. सलमा तौफिक मुल्ला (वय 35, रा. स्टेट बँकेजवळ, शिरोळ) यांनी फिर्याद दिली.

पीडिता सलमा यांचा मिरजेतील सुंदरनगर भागात राहणार्‍या तौफिक मीरासाहेब मुल्ला याच्याशी 2016 साली झाला होता. विवाहाचा संपूर्ण खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता. लग्नात तेरा तोळे सोनेही घातले होते. काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुल्ला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

नणंद रेश्मा मिरासाब मुल्ला (रा. इचलकरंजी), अफसाना आसिफ जमादार (रा. कोल्हापूर), आयेशा रिजवान मुतवल्ली (रा. मिरज) आणि आफ्रिन सनी शेख (रा. शिरोळ) यांनी याप्रकरणी मदत केली. सासरा मीरासाहेब मुल्ला (रा. मळणगाव), सासू दिलशाद आणि दीर इमरान यांनीही मानसिक त्रास दिला. विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तौफिकसह सासरची सर्वच मंडळी नाराज झाली. बाळंतपणाचा खर्च, तसेच कारसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला. तसेच पुन्हा मुलगी जन्माला आली.

त्यानंतर सासरच्या मंडळींनी पतीचे दुसरे लग्न करून देण्याची धमकी दिली. माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांत पती, सासू, सासरा, दीर आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT