मिरज : कृष्णाघाट रस्ता येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवारी मिरज शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे.
मिरज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला कृष्णाघाट रस्ता लोखंडी पुलाजवळ मोठी गळती लागली आहे. दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. शहरातील काही भागांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.