मिरज : ऊसतोड कामगार पुरवठ्याचे आमिष दाखवून बेळंकी येथील संभाजी वसंत रणदिवे यांची अकरा लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी किरण बालाजी करांडे (रा. अराती, ता. धाराशिव) या मुकादमाविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी हे ऊस वाहतूकदार असून 2022-23 च्या हंगामासाठी करांडे याने त्यांना कामगार पुरविण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी रणदिवे यांच्याकडून रोख व ऑनलाईन असे एकूण 11 लाख 7 हजार रुपये घेतले होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर करांडे याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामगार उपलब्ध करून दिले नाहीत. टाळाटाळ सुरू झाल्याने रणदिवे यांनी करांडे यास आगाऊ दिलेली रक्कम परत मागितली. परंतु करांडे याने पैसे न देता उडवाउडवी सुरू केल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याचे रणदिवे यांनी तक्रारीत म्हटले आहे.