जत : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती राहुल पांडुरंग गेजगे, आई ताई समाधान पारसे, वडील समाधान कुंडलिक पारसे, सासू रुक्मिणी पांडुरंग गेजगे, सासरा पांडुरंग शंकर गेजगे, भटजी अर्जुन गुरव यांचा समावेश आहे.
आई, वडील, सासू, सासरे, भटजी यांना संबंधित मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, हे माहीत असतानादेखील त्यांनी संगनमत करून राहुल पांडुरंग गेजगे याच्याशी लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून फिर्यादी गर्भवती राहिली.