Milk and Dairy Price Hike file photo
सांगली

Milk and Dairy Price Hike | दूध २, श्रीखंड २०, तर तूप ८० रुपयांनी महागले; आजपासून नवी दरवाढ

दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दुधाचे वाढलेले भाव, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मंगळवार ११ ऑगस्टपासून लागू करण्यात येत असल्याची माहिती दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चेतन दडगे, उपाध्यक्ष निखिल पाटील यांनी दिली.

गेल्या दोन, तीन महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढला असून, कच्च्या मालाचे भावही वाढले आहेत. दुधाचे वाढलेले भाव, वीज बिल, पॅकेजिंग प्लास्टिकचे वाढलेले भाव यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांच्या उत्पादन शुल्कात वाढ झाली आहे. यामुळे ही भाववाढ करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. मलई दही, ताक, बासुंदी आणि खवा यांचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT