Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : सांगलीत परप्रांतीय मजुराचा ट्रकखाली सापडून मृत्यू

अभयनगर येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : अभयनगर येथील सांगली मेटल स्क्रॅप मर्चंट कंपनीच्या आवारात ट्रक पाठीमागे घेत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका परप्रांतीय कामगाराचा जागीच चिरडून मृत्यू झाला. वीरेंद्र सुखदेव निशाद (वय ४५, मूळ रा. दुर्जनडेरा, जि. बांदा, उत्तर प्रदेश, सध्या रा. कुपवाड) असे मृत मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चालक शोएब शकील मगदूम (वय २८, रा. सबीना कॉम्प्लेक्स, सांगली) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच १२ एल ९४५६) पाठीमागे घेत होता. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिशय निष्काळजीपणे आणि वेगात ट्रक मागे घेण्यात आला. नेमके त्याचवेळी प्रवेशद्वाराच्या कमानीबाहेरील बाकड्यावर बसलेले वीरेंद्र निशाद हे बाकावरून उठून पुढे जात होते.

ते चालकाच्या निदर्शनास न आल्याने वीरेंद्र हे ट्रकच्या चाकाखाली आले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वीरेंद्र यांचा पुतण्या शिवमंगल सुखपाल निशाद याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक शोएब मगदूम याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT