विवाहिता खून; पुरावा नष्ट करण्याचा संशयितांचा प्रयत्न 
सांगली

Sangli Crime : विवाहिता खून; पुरावा नष्ट करण्याचा संशयितांचा प्रयत्न

खुनावेळी कोणते हत्यार वापरले, याचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील अकबर मोहल्ला परिसरातील नवविवाहिता जैनब मुजफर खान (वय २१) हिच्या खुनानंतर संशयितांनी घटना घडलेली खोली धुऊन तेथील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. खुनावेळी कोणते हत्यार वापरले, कोणाची काय भूमिका होती, याचा अजून उलगडा झालेला नाही.

खूनप्रकरणी पती मारीफ ऊर्फ मुजफर रमजान खान (वय २१), सासरा मोहम्मद रमजान जमाल खान (वय ४६), सासू साबीरा रमजान खान (वय ४१, सर्व रा. अकबर मोहल्ला, ईश्वरपूर) हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

संशयितांनी शनिवारी जैनब हिचा डोक्यात जड हत्यार्‍याने वार करून, गळा दाबून खून केला होता. त्यानंतर जैनब हिचा मृतदेह कॉटवर ठेवला. जैनब ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची अफवा पती मुजफरसह इतर संशयितांनी परिसरात पसरवली होती. दरम्यान, या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. रविवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिच्या डोक्यास गंभीर मार लागून मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT