सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एकास तब्बल २३ लाख ५६ हजार ९०७ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सुनील बाळासाहेब सलगर यांनी आशिष दादासाहेब अनुसे (वय २९, रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयित आशिष याने सुनील यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार सुनील यांनी ४३ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु आशिष याने १९ लाख ४३ हजार ९३ रुपये परत दिले. परंतु उर्वरित २३ लाख ५६ हजार ९०७ रुपयांची रक्कम परत न देता फसवणूक केली असल्याचे सुनील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.