ईश्वरपूर : ‘तिळगूळ घ्या... गोड गोड बोला...’ या पारंपरिक संदेशाने नाती अधिक घट्ट करणारा मकरसंक्रांतीचा सण म्हणजे महिलांचा आनंदसोहळाच. हाच गोडवा आणि आपुलकी जपत दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्यावतीने ईश्वरपूरसह वाळवा व शिराळा तालुक्यातील महिलांसाठी रविवार, दि. 18 रोजी साडेअकरा वाजता संक्रांत हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ईश्वरपूर येथील विजया सांस्कृतिक भवनात उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला वेदिका वनग्राम तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख उदयसिंह अरविंदराव सरनोबत प्रायोजक आहेत. कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत वाढवण्यासाठी मोनिका यांची खास खेळ-गाणी सादर होणार आहेत. पारंपरिक व आधुनिकतेचा सुरेख संगम असलेला हा सोहळा महिलांसाठी आनंद, उत्साह घेऊन येणार आहे.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे उपस्थित महिलांमधून काढण्यात येणाऱ्या तीन पैठणी. तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांसाठीचा भव्य लकी ड्रॉ हा कार्यक्रमाची शान वाढवणारा ठरणार आहे. जाधव वॉच अँड ऑप्टिकल यांच्याकडून 10 हॅन्ड वॉच, राजमाने ब्रदर्सकडून 5 गिफ्ट हॅम्पर, पेटकर सराफ यांच्याकडून 7 आकर्षक भेटवस्तू, जय महाराष्ट्र बाजारकडून 10 अनब्रेकेबल लॉन्ड्री बास्केट, अवसरे ज्वेलर्सकडून 10 कोल्हापुरी साज नेकलेस, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स (कापूसखेड) यांच्याकडून दोन कस्तुरींना दोनदिवसीय सहल फ्री व दोन कस्तुरींना एकदिवसीय मुक्कामावर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय अंतरंग हँडलूम, ईश्वरपूरकडून 10 सखींना हमखास गिफ्ट हॅम्पर, ऑलक्लेअर फार्मास्युटिकल्सकडून 10 व्हेजिटेबल कटर, तर सूरज ट्रेडर्स अँड ऑईल, ईश्वरपूरकडून पाच सभासदांना पाच लिटर तेलाचे कॅन मोफत मिळणार आहेत.
महिलांच्या आनंदासाठी, सन्मानासाठी आणि एकोपा वाढवण्यासाठी आयोजित केलेला हा हळदी-कुंकू सोहळा कस्तुरींसाठी सांस्कृतिक जीवनात नक्कीच गोड आठवणींची भर घालणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कस्तुरी क्लब आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आयोजक मधु देसावळे (मो. 8308706122) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.