सांगली : स्वच्छता कर्मचार्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे. Pudhari Photo
सांगली

महापालिकेचे महास्वच्छता अभियान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

‘स्वच्छता हीच सेवा’अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा समारोप बुधवारी महास्वच्छता अभियान राबवून झाला. शास्त्री चौक ते दूरदर्शन केंद्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. स्वच्छता पंधरवड्यात महापालिकेकडून शहरात महत्त्वाच्या 12 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘स्वच्छता हीच सेवा’अंतर्गत जनजागृती, सायकल रॅली, महास्वच्छता अभियान, ‘टाकाऊपासून टिकाऊ’अंतर्गत स्थळ सुशोभीकरण स्पर्धा, ‘स्वच्छता मित्र’ पुरस्कार, ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ नियुक्ती कार्यक्रम तसेच स्वच्छता संदेश देणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या स्वच्छता पंधरवड्याची बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता झाली.

यानिमित्ताने उल्लेखनीय काम केलेले स्वच्छता कर्मचारी, महिला कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त विजया यादव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जलनिस्सारण अभियंता तेजस शहा, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, ‘स्वच्छ सर्वेक्षण’च्या शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, अनिल पाटील आदी उपस्थित होते. दीपक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT