Fraud Pudhari
सांगली

Loan Fraud: कर्ज काढून दोन लाखांची फसवणूक

पिग्मी एजंटासह तिघांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : समडोळी (ता. मिरज) येथे बनावट कागदपत्रे आणि सह्यांचा वापर करून एका कुटुंबाच्या नावे पतसंस्थेत खाते काढून त्यावर 2 लाखांचे कर्ज काढून संबंधितांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वप्निल नायकू मस्कर (रा. जनसेवा मंडळ, समडोळी, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित पिग्मी एजंट प्रवीण नायकू मस्कर (वय 35), सचिव जयपाल भूपाल ढोले (43) आणि अध्यक्ष प्रदीप आदाप्पा खोत (43, सर्व रा. समडोळी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गावातील कर्मवीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत फिर्यादी स्वप्निल मस्कर यांचे खाते नाही, मात्र तिघा संशयितांनी संगनमत करून फिर्यादी स्वप्निल, त्यांचे वडील नायकू श्रीपती मस्कर आणि आई इंदुमती नायकू मस्कर यांच्या नावे खाते काढले. याकरिता बनावट कागदपत्रे आणि तिघांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केला.

या बनावट खात्यावर 2 लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. यासाठी जामीनदाराची बोगस स्वाक्षरी करण्यात आली. हा प्रकार 27 एप्रिल 2018 ते 27 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT