Leopard Pudhari
सांगली

Sangli News : शिरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : शिरगाव (ता. कडेगाव) येथे मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकरी सयाजी होनमाने यांच्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात चार शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत.

सयाजी होनमाने यांच्या शेतातील घराच्या पाठीमागे शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यात ३५ ते ४० शेळ्या-मेंढ्या बांधलेल्या होत्या. मंगळवारी रात्री गोठ्यात अचानक विचित्र आवाज येऊ लागल्याने शेळ्या ओरडू लागल्या. आवाज ऐकून होनमाने आणि त्यांचा मुलगा तात्काळ घराबाहेर आले. त्यांना शेळ्या घाबरून पळताना दिसल्या. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधारामुळे काहीच स्पष्ट दिसले नाही. याच गोंधळात काही शेळ्या अंधारात बाहेर पळाल्या. होनमाने यांनी रात्रभर पळालेल्या शेळ्यांचा शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास संदे मळ्यात काही शेळ्या आढळून आल्या. मात्र, जवळच असलेल्या शेतात चार शेळ्यांच्या शरीराचे अवयव विच्छिन्न अवस्थेत सापडले. तसेच परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT