Crime News file photo
सांगली

Kupwad Crime: कुपवाडमध्ये पिस्तूलसह एकास अटक

51 हजारांचे पिस्तूल जप्त : पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला कुपवाड पोलिसांनी सोमवार, दि. 23 रोजी दुपारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वालचंद मारुती आंधळे (वय 22, मूळ गाव आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड; सध्या रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांना औद्योगिक वसाहतीतील निर्जनस्थळी एक तरुण संशयास्पदरीत्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. याआधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि 1600 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. संशयिताने हे शस्त्र कोठून आणले आणि त्याचा उद्देश काय होता, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT