सांगली

कुपवाड : गवळ्यावर हल्ला; संशयितास अटक

backup backup

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : सचिन जुगलकिशोर बलदवा (वय 46, रा. आर. पी. पाटील शाळेजवळ, कुपवाड) यांना रस्त्यामध्ये अडवून काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी संशयित शाहरुख फारुख मकानदार (वय 27, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड) याला कुपवाड पोलिसांनी अटक केली.

जखमी सचिन बलदवा हे गवळी शनिवारी दुपारी सोसायटी चौकातून दुचाकीवरुन घराकडे जात होते. यावेळी मकानदार या संशयिताने बलदवा यांना रस्त्यात अडविले. 'तुला गावात दुधाचा धंदा करायचा असेल तर मला महिन्याला 20 हजार रुपये खंडणी दिली पाहिजे', असे म्हणून काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बलदवा जखमी झाले. संशयित शाहरुख मकानदार याने हातात तलवार घेऊन बलदवा याच्या घरात घुसून 'तुला जिवंत ठेवणार नाही,' अशी धमकी दिली असल्याची तक्रार बलदवा यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

SCROLL FOR NEXT