Kolhapur Couple Accident Shirdhon file photo
सांगली

Accident: शिरढोणजवळ भीषण अपघातात कोल्हापूरचे दांपत्य ठार

Kolhapur Couple Accident Shirdhon: रत्नागिरी–नागपूर महामार्गावर शिरढोण गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Couple Accident Shirdhon:

कवठेमहांकाळ: रत्नागिरी–नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ मंगळवारी (दि. २४) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगन आर कारने रस्त्याच्या साईड पट्टीवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला.

संतोष धोंडीराम गायकवाड आणि वंदना संतोष गायकवाड (रा. जय भवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड दांपत्य वॅगन आर कार (क्र. एमएच ०९ एफजी २८१५) मधून सोलापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शिरढोणजवळ रस्त्यालगत साईड पट्टीवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच ०९ सीजे २६७१) व त्याच्या ट्रॉलीला (क्र. एमएच १३ टी ०९३९) त्यांच्या कारने भरधाव वेगात मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT