आटपाडीत बलात्कार पिडीतेवर चाकू हल्ला File Photo
सांगली

आटपाडीत बलात्कार पिडीतेवर चाकू हल्ला

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बलात्कार पीडित मुलीवर शनिवारी (दि.5) चाकू हल्ला झाला. घराच्या बाहेर भांडी घासत असताना रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. सुदैवाने पीडितेला कोणतीही इजा झाली नाही.परंतु या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ऑगस्ट महिन्यात एका अल्पवयीन मुलीला एका जिम चालकाने खाजगी परिचारिकेच्या सहकार्याने जबरदस्ती गाडीत बसवून नेत बलात्कार करण्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्र लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पीडिता घराच्या बाहेर भांडी धुऊन उभारली असताना तीन अनोळखी युवकांनी तिच्यावर कटरने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. मात्र अंगावरील कपडे फाटले आहेत. घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर सापडले आहे.या घटनेने पीडित कुटुंब पूर्णपणे भयभीत झाले आहे.

आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्या अटकेनंतर आटपाडी शहरामध्ये सर्वसमाजाने मोर्चा काढत नराधम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता. नराधम संग्राम देशमुख यांचे अनेक गैरकृत्य समोर येण्याची शक्यता आटपाडी तालुक्यामध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपी अटक असताना पीडितेवर हल्ला नेमका कोणी आणि कशासाठी केला ? हे मात्र समजू शकले नाही.घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी धाव घेत पाहणी केली.पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT