सांगली : शेतकऱ्यांना दिवसा विनाखंडित वीज देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
शेतकऱ्यांना दिवसा विनाखंडित वीज द्यावी, नवीन वीज जोडणी तत्काळ द्यावी, सौरपंपाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांना सौरसंच खरेदीबाबत पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, सौरपंपांच्या प्रलंबित जोडण्या तत्काळ द्याव्यात, अन्यथा अनामत भरलेल्या रकमेवर 7 टक्के व्याज द्यावे, अशा मागण्या केल्या. मोर्चाची सुरुवात विश्रामबाग चौकातून केली. मोर्चामध्ये जिल्हा ऊर्जा आयाम प्रमुख नारायण वाघमोडे, अंबादास माळी, चंदन पाटील, अजित जाधव, महावीर कर्वे, नीलेश लोकरे सहभागी होते.