खरसुंडीत सिध्दनाथांच्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी Pudhari Photo
सांगली

Siddhanath Yatra : खरसुंडीत सिध्दनाथांच्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी

प्रशासन सतर्क; 11 एप्रिलला पुन्हा आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यात्रेचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठक झाली.

14 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना सज्ज राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सिद्धनाथ देवस्थानच्या सभागृहात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी, मानकरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य जयदीप भोसले, पंचायत समिती सदस्या डॉ. मीनाक्षी पुजारी आणि बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी यात्रेकरूंच्या सोयी-सुविधांबाबत सूचना मांडल्या. गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार, पोलिस निरीक्षक विनय बहिर, सरपंच धोंडिराम इंगवले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी बांदल यांनी पोलिस निरीक्षक विनय बहिर यांना मुख्य परिसरात सीसीटीव्ही वाढवण्याचे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांची दुरुस्ती, अडथळे दूर करणे आणि बाजूपट्ट्यांची मजबुती, याबाबत सूचना केल्या. यात्रेतील पारंपरिक सोहळे वेळेत आणि सुरळीत पार पडावेत, यासाठी मानकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले. भाविकांसाठी आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय सेवा, अखंडित वीज व पाणीपुरवठा, यावर विशेष भर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT