विटा : विवाहितेचा विनय भंग प्रकरणी तपास करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर संशयिताने चक्क हात उगारल्या ची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.
पोलीस आणि गुन्हेगार यांचे नाते हळूहळू नाजूक होताना दिसत आहे. पोलीस मित्र, पोलीस व नागरिक यांच्यात दुवा साधणारी इतर अनेक पदे किंवा स्वयंसेवी भूमिका आहेत. यांसारख्या पदांमुळे पोलिसांना स्थानिक पातळीवर माहिती पुरवणे, गर्दीचे नियं त्रण करणे अशी कामे साधली जातात. परंतु अलीकडच्या काळात पोलीस आणि जनता यांच्यात दुवा साधून गुन्हेगारांवर वचक बसण्या ऐवजी गुन्हेगार मंडळी पोलिसांच्या खांद्यावर हात टाकून वावरत असल्याचे सर्वत्र दिसून येते.
अशीच एक घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. एका विवाहितेचा विनयभंग प्रकरणाचा तपास कराय ला गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच संबंधित संशयिताने चक्क हात उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित तपाशी अधिकारी हा घटनास्थळावर पंचनामा करायला गेले असता या प्रकरणातील संशयिताने हात टाकल्याची आणि पोलीस प्रशासनाची बदनामी नको म्हणून हे प्रकरण दडपले जात आहे, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे.
या प्रकरणाची तालुकाभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, मारहाण झालेली नाही, केवळ आपली कॉलर पकडली, त्याबाबत आम्ही सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करणार आहोत असे स्पष्टीकरण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.