Accident File Photo
सांगली

Sangli News : टेम्पोचा थरारक पाठलाग; इंधन संपल्याने चालक जेरबंद

मंगळवेढ्यात अपघात करून फरार झालेल्या टेम्पोचा २० ते २५ दुचाकींसह चारचाकी वाहनांनी पाठलाग

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा परिसरात अपघात करून फरार झालेल्या आयशर टेम्पोचा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची परिसरात थरारक पाठलाग करण्यात आला. सुमारे २० ते २५ दुचाकींसह चारचाकी वाहनांनी टेम्पोचा पाठलाग केला. अखेर कुची गावाजवळ टेम्पोमधील इंधन संपल्याने चालकाला पकडण्यात आले.

मंगळवेढा परिसरात अपघात करून आयशर चालक वाहनासह पसार झाला होता. त्याचा माग काढत काही नागरिक व वाहनधारकांनी पाठलाग सुरू केला. आयशर वेगाने पुढे जात असल्याने पाठलाग करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत गेली. कवठेमहांकाळ तालुक्यात प्रवेश केल्यानंतर २० ते २५ दुचाकी तसेच चारचाकी वाहनांनी आयशरचा पाठलाग केला. या थरारक पाठलागामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चालकाने वाहन वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुची गावाच्या परिसरात आयशरमधील इंधन संपल्याने वाहन थांबले. त्यानंतर पाठलाग करणाऱ्यांनी चालकाला पकडून घटनेची माहिती संबंधित पोलिसांना दिली. सोलापूर पोलिसांनी टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT