कवठेमहांकाळ ः कवठेमहांकाळ ते मिरजमार्गे कुकटोळीला जाणार्या बसफेर्या पुन्हा सुरू कराव्यात, या मागणीसाठी कुकटोळी येथील ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी बस रोखून ठेवत आंदोलन केले. कोरोना महामारीपूर्वी सुरू असलेल्या सर्व फेर्या पुन्हा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
कवठेमहांकाळ, खंडेराजुरी, मालगावमार्गे मिरजकडे बससेवा बंद झाल्याने कुकटोळी गाव पूर्णपणे बससेवेपासून तुटले आहे. मिरज आणि कवठेमहांकाळच्या सीमेवर असलेल्या या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण आणि इतर कामांसाठी मिरज, सांगली आणि पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे जातात. मात्र, सरपंच तानाजी यमगर, महेश देसाई, माजी सरपंच शिवाजी कारंडे यांच्यासह ग्रामस्थांनी रास्ता रोको सुरू केला होता. अखेर, आगार व्यवस्थापकांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी बस सोडून दिली. राजाराम पाटील, संजय चव्हाण, प्रकाश पाटील, रघुनाथ देसाई, सुभाष वाघमारे, मिलिंद देवकते, अनिल यमगर, प्रशांत निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.