इस्लामपूर : ‘दैनिक पुढारी कस्तुरी क्लब’च्यावतीने इस्लामपूर शहर व परिसरातील महिलांसाठी झी मराठी श्रावण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत येथील राजारामबापू नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
श्रावण क्वीनसाठी आपण तीन बक्षिसे काढण्यात येणार असून पहिल्या मानकरी महिलेला क्राऊन मोमेंटो, साडी आणि एक हजार रुपये, दुसर्या क्रमांकासाठी क्राऊन मोमेंटो, साडी, सातशे रुपये रोख दिले जाणार आहेत. तसेच तिसर्या क्रमांकासाठी ग्राऊंड मोमेंटो, साडी व 500 रुपये रोख दिले जाणार आहेत. तसेच ‘मंगळागौरीचा खेळ खेळूया’ या झी टीव्ही कलाकारांसोबत भरपूर बक्षिसांचा खजाना महिलांना मिळणार आहे. निवेदिका मोनिका करंदीकर यांच्या खास शैलीतून कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. याप्रसंगी सर्व उपस्थित महिलांना लक्ष्मीची पावले भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
2024-25 चा लकी ड्रॉ या कार्यक्रमात काढला जाणार आहे. यामध्ये भाग्यवान महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. इस्लामपूर येथील प्रसिद्ध कुमकुम कलेक्शन यांच्यावतीने 25 महिलांना सुंदर साड्यांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर वन ग्राम वेदिका ज्वेलर्स यांच्यातर्फे 10 महिलांना आकर्षक ज्वेलरी सेट देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी यावर्षीची सभासद नोंदणी केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी
मधू देसावळे - 8308706122.
मंगळागौर तसेच श्रावण क्वीन असे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे झी मराठीवरील ‘पारू’ या मालिकेतील मुग्धा कर्णिक- अहिल्या किर्लोस्कर, पूर्वा शिंदे-दिशा या कलाकारांचा सहभाग असणार आहे. महिलांना या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.