कारंदवाडीत बिबट्याची तीन पिले  
सांगली

Leopard News : कारंदवाडीत बिबट्याची तीन पिले

परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील तोडकर मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यालगत सदाशिव दळवी यांच्या शेतातील उसात मंगळवार, दि. 23 रोजी रात्री बिबट्याची तीन पिले आढळून आली. येथील शेतकर्‍यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

कारंदवाडी येथील शेतात ऊसतोड सुरू आहे. मंगळवारी या परिसरात बिबट्याची तीन नवजात पिले आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच सांगली वन विभागाचे अजित पाटील, वनमजूर इकबाल पठाण व पथक कारंदवाडीत दाखल झाले. परंतु घटनास्थळ कारंदवाडी हद्दीत असल्याने शिराळा येथून वन्यजीव पथक बोलावण्यात आले. वनरक्षक भिवा कोळेकर, युनूस मणेर व गौरव गायकवाड यांच्यासह पथक तसेच कारंदवाडीचे पोलिस पाटील अमित जाधव घटनास्थळी दाखल झाले. कोळेकर यांनी या तीनही पिलांना ताब्यात घेऊन आष्टा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. येथे पशुधन पर्यवेक्षक मुकुंद वाटेगावकर यांनी या पिलांची तपासणी करून त्यांना अन्न व औषधोपचार दिले. यानंतर पिले जेथे सापडली, तेथेच सुरक्षितपणे सोडण्यात आली. दरम्यान, सांगली येथील सहायक उप वनसंरक्षक कांबळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT