theft Pudhari
सांगली

Sangli Theft: कडेगावातील चोरीचा छडा; चोरटा जेरबंद

सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त; तिघे संशयित पसार

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : कडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या परराज्यातील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. गवली छत्तेसिंग आदिवासी (वय २२, रा. चौपडा, ता. साईनगर, जि. पन्ना, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १६ हजार १५० रुपयांचे ७० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, असा १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ​स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

अभिजित ठाणेकर यांना कडेगाव ते कडेपूर रोडवर राजवीर मंगल कार्यालयाजवळ चार संशयित चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. ​याआधारे पथकाने सापळा रचला. चारही संशयित दोन दुचाकींवरून तेथे आले असता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तिघे दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर गवली छत्तेसिंग आदिवासी पोलिसांच्या हाती लागला. झडतीत त्याच्याकडे चांदीचे ब्रेसलेट व करदोडा आढळून आला.

अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या तीन साथीदारांच्या (जबरास जगदीश पारधी, कुणाल कंजर आणि महाराजा सुरभ लेले, सर्व रा. मध्य प्रदेश) मदतीने कडेगाव परिसरात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT