खासदार विशाल पाटील File Photo
सांगली

जयश्री पाटील भाजपसोबत जाणे अनैसर्गिक युती : विशाल पाटील

पाटील यांचा निर्णय जनता स्वीकारणार नाही

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपसोबत जाणे ही अनैसर्गिक युती असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, जयश्री पाटील यांनी भाजपसोबत जाणे अनैसर्गिक युती होईल. दबावाखाली त्यांनी हा निर्णय घेतला असेल. त्यांचा निर्णय जनता स्वीकारणार नाही. शेवटपर्यंत हा निर्णय नेला, तर जशी पूर्वी सुद्धा 1999 मध्ये अनैसर्गिक युती झाली होती, तेव्हा निवडणुकीत फटका बसला होता. मला अजूनही असे वाटते की, त्यांनी असा निर्णय घेऊ नये.

चंद्रकांत पाटील यांचे आभार...

खासदार पाटील म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपात येण्याची ऑफर दिल्याबद्दल मी त्यांचे निश्चितच आभार मानतो. कदाचित माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली असेल. माझ्या कामाची ही पोहोचपावती, असे मी समजतो. येणार्‍या टर्ममध्ये तूर्त तरी असा कोणताही निर्णय माझ्याकडून होईल, असे मला वाटत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT