कसबे डिग्रज/इस्लामपूर : गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्याला दोष कसा देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केला.
तुंग (ता. मिरज) येथे महाविकास आघाडीच्या प्रचार प्रारंभ सभेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, प्रतीक पाटील, आनंदराव नलवडे, उद्योजक भालचंद्र पाटील, माजी सभापती वैभव पाटील, माजी महापौर मैमुद्दीन बागवान, सरपंच विमल सूर्यवंशी, भास्करराव पाटील, सचिन पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, काँग्रेसचे राजेंद्र शिंदे, अॅड. आर. आर. पाटील, शिकील सय्यद उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष उमेदवारी मिळण्यासाठी दुसर्या पक्षात गेला आहे. नुसते जाकीट घालून आमदार होता येत नाही. वैभव शिंदे म्हणाले, आपण आष्ट्याची चिंता करू नका. आम्ही किती मताधिक्य देतो, ते पहा. बी. जी. पाटील, भालचंद्र पाटील, सुस्मिता जाधव, भास्करराव पाटील, बी. के. पाटील, शहाजी पाटील, अॅड. आर. आर. पाटील, वैभव पाटील, कविता पाटील, एस. के. पाटील, सचिन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.